… तेव्हा फडणवीस म्हणाले ‘चूक’ झाली; भाजप- शिवसेना युतीबाबत विक्रम गोखलेंचा दावा

0
6
… तेव्हा फडणवीस म्हणाले ‘चूक’ झाली; भाजप- शिवसेना युतीबाबत विक्रम गोखलेंचा दावा

[ad_1]

पुणेः ‘बाळासाहेबांनी ज्या कारणाकरता शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळं मराठी माणसाला आधार वाटला. त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा मला प्रत्यय आलाय. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही,’ असं परखड मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मांडले आहे.

७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी शिवसेना- भाजप युतीवर भाष्य केलं आहे. तसंच, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

‘बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारणात जे खेळ चालू आहेत ते विचित्र स्तरावर पोहचले आहेत. त्यात महाराष्ट्रातील माणूस भरडला जातोय. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. शिवसेना- भाजपला एकत्र आणण्याकरता माझे प्रयत्न चालू आहेत, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे. तसंच, ज्यांच्याकडे फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजप आघाडीबाबत पुढाकार घाययला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

‘शिवसेना- भाजप युतीबाबत मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली. तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारले आहेत. त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर तुमचं तरी काय बिघडलं असतं?, असा प्रश्न मी देवेंद्र फडणवीसांना विचारला होता. त्यावर त्यांनी झाली चूक असं मान्य केलं आहे,’ असा दावा विक्रम गोखले यांनी केला आहे.

‘खरं तर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. ती आता आपण भोगत आहोत. मी तोंड दाबण्याने बांधून घेत नाही. त्यामुळेच मी कोणत्याही राजकीय पक्षांना बांधिल नाहीये. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश बिदेश झुगारुन देतो,’ असंही गोखले यांनी म्हटलं आहे.

एसटी संपावर विक्रम गोखलेंची प्रतिक्रिया

‘मी एकेकाळचा एसटी मंहामंडळाचा ब्रँड अॅबेसिटर आहे. एसटी, एअर इंडियाला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केलं आहे. एसटी घरोघरी- दारोदारी जाणारी आहे. एसटी मंहामंडळाकडे १८ हजार बसेसे आहेत. जगात एसटी नंबर १ आहे. इतकं मोठं जाळ विणलंय एसटीने. त्याची आता वाट लावली,’ अशी टीका विक्रम गोखलेंनी केली आहे.

देश कधीही हिरवा होणार नाही

लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असंही विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा